Advertisement
Advertisement
Land map on Mobile App : नमस्कार मित्रांनो, आपल्या शेत जमिनीचा बांधाचा लांबी रुंदी सह नकाशा कसा पहावा याची माहिती आपण पाहणार आहोत. अक्षांश रेखांशा सह जमिनीचा नकाशा तुम्ही मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.
महसूल विभागाकडून नागरिकांसाठी विविध सेवा पुरविला जातात. ज्यामध्ये जमीन नकाशा लँड मॅप नागरिकांना उपलब्ध करून दिला जातो.
Download Land map on Mobile App : जमिनीच्या बांधावरून होणारे वाद कमी व्हावेत तसेच आपल्या जमिनीची सीमा हद्द नागरिकांना माहीत असायला हवी यासाठी डिजिटल पद्धतीने लँड मॅप रेकॉर्ड तयार करण्यात येत आहेत.
येथे पहा आपल्या बांधाची लांबी रुंदी ऑनलाईन
जमिनीचा नकाशा ऑनलाईन मोबाईलवर कसा पाहायचा ?
- सर्वात अगोदर आपल्या ब्राउजर मध्ये mahabhunakasha.mahabhumi.gov.in असं सर्च करा.
- तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
- या पेजवर डाव्या बाजूला Location या नावाने रकाना दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्हाला राज्य, कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय असतील. जर तुम्ही गावात असाल तर, रुरल हा पर्याय निवडा आणि शहरी भागात असाल तर अर्बन हा पर्याय निवडा.
- त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे.
- ही सर्व माहिती निवडल्यानंतर Village Map या बटणावर क्लिक करा.
- यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात आहे, त्या गावाचा नकाशा तुमच्या समोर ओपन होईल.
- होम या ऑप्शन समोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्हाला नकाशा फुलस्क्रीन मध्ये बघू शकता.
- डावीकडील + हे बटण दाबून नकाशा मोठा करू शकता तर – हे बटण दाबून पुन्हा नकाशा लहान करू शकता.
- पुढे डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसत आहेत, त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जायचं आहे.
जमिनीचे मोजमाप केल्याने आपल्या जमिनीची लांबी रुंदी माहीत असेल तर त्याचा उपयोग नक्कीच होईल.
Advertisement
No comments:
Post a Comment